Posts

Showing posts from April, 2023

बटाटा वडा रेसिपी मराठी

Image
महाराष्ट्रातील बटाटे वडे. साहित्य.: बटाटे, कडीपत्ता कोथिंबीर आलं लसूण जीरे मोहरी हिंग हळद ,तेल बेसण हिरव्या मिरच्या,गोडा मसाला ओवा,हिंग. कृती. प्रथम बेसण घेऊन हळूहळू पाणी ओतावे व चांगले एकजीव करुन कालवुन घ्यावे मध्यम पीठ कालवावे त्यात ओवा; घालावा ,तसाच घालावं खाताना दाताखाली आला कि मसरत लागतो व पीठ झाकुन ठेवावे बटाटे कुकरमध्ये चांगले उकडून घ्या साल काढून मस्त कुस्करून घ्यावे. आता कडईत तेल घालून त्यात जीरमोहरी टाकावी तडतडली कि मग हिरव्या मिरच्या आले लसूण बारीक वाटून घालावे व शेवटी हळद व कडीपत्ता घालवा मग गॅस बंद करावा हे मिश्रण कुस्करून घेतलेल्या बटाट्यात घालावे तसेच गोडा मसाला ‌‌‌‌‌‌‌मग चमच्याने चांगले मिसळून घ्यावे व कोथिंबीर घालून हव्या त्या आकारात बटाट्याचे वडे थापून घ्या. मग कढईत तेल घालून मोठ्या फ्लेमवर तेल चांगले तापवून घ्यावे मग फ्लेम मध्यम करून वडे कालवलेल्या पीठात बुडवून हळूहळू तेलात सोडावे सोनेरी रंगावर चांगले तळुन घ्यावे. हे बटाटेवडे खावुन बघा सुपर टेस्टि लागतात. बटाटा वडा फेमस महाराष्ट्र वडा